Get Adobe Flash player
  स्व. यशवंतराव चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली मे १९६२ मध्ये पुणे जिल्हा परिषदे ची स्थापना झाली.
  स्व. शंकरराव दशरथराव उरसळ यांना पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्याचा पहिला मान मिळाला. त्यांनी दि १२/८/१९६२ ते ११/८/१९७२ पर्यत अध्यक्ष पद भुषविले. तेव्हापासून आज अखेर 22 अध्यक्ष झाले. सध्या मा.श्री.विश्वासराव देवकाते अध्यक्षपद भुषवत आहे.
  आज रोजी १३ पंचायत समित्या व १४०७ ग्राम पंचायती ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत आहेत. शासनाचे कोणतेही नवीन योजना, अभियान, मोहिम, राबविण्यात पुणे जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहीलेली आहे.
  सन 2012 साली पुणे जिल्हा परिषद आय.एस.ओ. 9001-2008 प्रमाणित झालेली आहे.
  यशवंत पंचायत राज अभियान सन २०११-२०१२ जिल्हा स्तरावर महाराष्ट्र राज्यमध्ये पुणे जिल्हा परिषद व्दितीय क्रमांक मानकरी ठरलेली आहे व पंचायत समिती स्तरावरील महाराष्ट्र राज्यमध्ये पंचायत समिती बारामती व्दितीय क्रमांक मानकरी ठरलेली आहे. आणि ग्रामपंचायत कांदली ता.जुन्नर गामपंचायत स्तरावरील महाराष्ट्र राज्यमध्ये तृतीय क्रमांक मानकरी ठरलेली आहे.
Copyright © 2010 Pune Zilla Parishad. All Rights Reserved.Designed & Developed By Maark Systems.